Dhootapapeshwar App is LIVE!
Download & Signup, to get SDL Points.

आयुर्वेदाच्या दृष्टीने पोटाच्या विविध विकारांची कारणे, लक्षणे आणि व्यवस्थापनाविषयी माहिती.
पोटाचे विकार (अम्लपित्त, यकृत-विकार, ग्रहणी इ.) – आयुर्वेदीय उपचार
आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावताना लोकांना वेळेची कमतरता भासते. त्यामुळे अवेळी, अनियमित व अयोग्य पद्धतीने अन्नसेवन करणे, रात्री जागरण, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यांसारख्या चुकीच्या सवयी सर्रास आढळतात. तसेच आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूड, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न तसेच विविध कृत्रिम पेये व शीतपेयांचा अतिरिक्त वापर यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. विशेषतः मध्यमवयीन व तरुण वर्गामध्ये अशा सवयी अधिक प्रमाणात आढळतात. आयुर्वेदशास्त्रानुसार अन्नसेवन करताना ‘तन्मना भुज्ञीत’ अर्थात जेवणामध्ये पूर्ण मन लावून आहार ग्रहण करावा असे सांगितले आहे. परंतु टी.व्ही., मोबाईल, संगणक यांसारख्या करमणुकीच्या साधनांचा अतिरेकी वापर तसेच मानसिक तणाव यांमुळे आहारसेवनाचे योग्य नियम दैनंदिन जीवनात पाळले जात नाहीत. मानसिक ताणतणाव व चिंता यांमुळे रात्री जागरण व अनिद्रा यांसारख्या समस्या निर्माण होतात. परिणामी खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन होत नाही. तसेच चुकीच्या आहारसवयींमुळे पोटातील अग्नीचे कार्य मंदावते व घेतलेला आहार व्यवस्थित पचत नाही. अतिप्रमाणात आंबट, तिखट व चमचमीत पदार्थांचे सेवन केल्याने अम्लपित्तासारखे विकार उद्भवतात. यामुळे भूक न लागणे, अपचन, आंबट किंवा करपट ढेकर येणे, गॅसेस, मळमळ, छातीत, पोटात किंवा घशात जळजळ होणे, डोकेदुखी, पोटदुखी, उलटी, जुलाब, ताप व थकवा यांसारखी लक्षणे दिसून येऊ शकतात.
आहारपचनामध्ये विकृती निर्माण झाल्यास शरीराचे योग्य पोषण होत नाही. तसेच दीर्घकालीन व वारंवार उद्भवणाऱ्या तक्रारींचा गंभीर परिणाम पोटातील तसेच शरीरातील इतर अवयवांवरही होऊ शकतो. यामुळे कावीळ, जलोदर यांसारखे यकृताचे विकार, व्रण (अल्सर), संग्रहणी, कोलायटीस यांसारखे आतड्यांचे विकार तसेच मूळव्याध यांसारखे अनेक आजार निर्माण होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी पोटाच्या तक्रारींवर आयुर्वेद उपचार पद्धती प्रभावी ठरू शकते. आयुर्वेदीय उपचारांमुळे शरीरातील अग्नी सुधारतो, पचनक्रिया सुरळीत होते, अन्नाचे योग्य पचन होऊन ते शरीराला पोषण देते व शरीराला बळ प्राप्त होते. पोटाचे विकार (अम्लपित्त, यकृत-विकार, अपचन इ.) आणि त्यावरील आयुर्वेदीय उपचार याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी गेली २५ वर्षे डोंबिवली येथे आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. महेश ठाकूर यांच्याशी संवाद साधणार आहेत सुप्रसिद्ध सूत्रसंचालक डॉ. महेश चिटणीस. डॉ. महेश ठाकूर सर्व प्रेक्षकांना एक महत्त्वाचा सल्ला देतात – "पोटाच्या विकारांवर वेळीच उपचार घ्या व गंभीर उपद्रवांपासून स्वतःचे संरक्षण करा."
The information shared in these blogs is for educational and informational purposes only and is based on Ayurvedic principles and the professional experience of the author. It is not intended to replace professional medical advice, diagnosis, or treatment. Please consult a qualified healthcare professional before making any health-related decisions. The author and website are not responsible for any outcomes resulting from the use of this information.
If you receive any unauthorised, suspicious or fraudulent offers or interview call or in case of any queries, please email us at healthcare@sdlindia.com
The original version of this article is published in English. Translations into other languages are provided solely as an additional bilingual support to enhance accessibility and convenience for readers.
While reasonable efforts have been made to provide accurate translations, these are generated using automated translation tools and may contain inaccuracies, omissions, or differences in interpretation. In the event of any discrepancy or inconsistency, the English version shall prevail and be considered the official and authoritative version.
The Company does not warrant or guarantee the accuracy, completeness, or reliability of the translated content and shall not be held responsible or liable for any errors, omissions, or consequences arising from reliance on the translated information.